1 / 7फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची सध्या जोरदार चर्चा आहे. या फेस्टिव्हलमध्ये मराठी सेलिब्रिटीही सहभागी झाले आहेत. 2 / 7सर्वांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतीच कान्स फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. 3 / 7या फेस्टिव्हलसाठी अभिनेत्रीने खास लूक केला होता. लाल रंगाच्या गाऊनमध्ये प्राजक्ता ग्लॅमरस दिसत होती. 4 / 7केस मोकळे सोडत गळ्यात खड्यांचा दागिना घालत आणि हातात पर्स घेत प्राजक्ताने फोटोसाठी खास पोझ दिल्या. 5 / 7कान्स फेस्टिव्हलमधील फोटो प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. 6 / 7प्राजक्ताचे हे फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'लय भारी', 'सार्थ अभिमान', 'छान दिसतेस' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 7 / 7प्राजक्तासोबत कान्स फेस्टिव्हलमध्ये अशोक सराफ-निवेदिता सराफ, अंकिता वालावलकर हे सेलिब्रिटीही दिसणार आहेत.