Join us

'पिंकीचा विजय असो'फेम निरीविषयी 'या' गोष्टी माहितीयेत का? मालिकेत येण्यापूर्वी करायची 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 12:51 IST

1 / 9
काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मालिका म्हणजे पिंकीचा विजय असो. अल्पावधीत ही मालिका लोकप्रिय झाली आहे.
2 / 9
ही मालिका सुरु झाल्यापासून सोशल मीडियावर पिंकीचा बोलबाला आहेच. पण, तिच्यासोबतच तिची धाकटी बहीण निरी हिचीदेखील चर्चा होऊ लागली आहे.
3 / 9
या मालिकेत निरी ही भूमिका अभिनेत्री सारिका साळुंखे हिने साकारली आहे.
4 / 9
सारिकाची पिंकीचा विजय असो ही पहिलीच मालिका आहे. मात्र, त्यापूर्वी ती सोशल मीडिया स्टारदेखील आहे.
5 / 9
सारिका मूळची साताऱ्याची आहे. तिचं प्राथमिक शिक्षणदेखील साताऱ्यामध्येच झालं आहे.
6 / 9
सारिकाने या मालिकेत काम करण्यापूर्वी अनेक शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं आहे.
7 / 9
वाडीवरची स्टोरी, पक्के सातारी या काही तिच्या शॉर्ट फिल्म गाजल्या आहेत.
8 / 9
पिंकीचा विजय असोमुळे सारिका सध्या घराघरात निरी याच नावाने ओळखली जाते.
9 / 9
पिंकी, निरी आणि दिप्या हे अतरंगी भावंडं प्रेक्षकांचे कमालीचं मनोरंजन करत आहेत.
टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी