Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्पोर्ट्स अँकर होती 'ही' अभिनेत्री! छोट्या पडद्यावर साकारतेय सासू, 'या' लोकप्रिय मालिकेत करतेय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 16:27 IST

1 / 8
स्पोर्ट्स अँकर म्हटलं की आपसूकच अभिनेत्री मंदिरा बेदीचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. मात्र, अशीच एक मराठी अभिनेत्री जिने तिच्या करिअरच्या सुरुवातीला एका न्यूज चॅनेलनवर काम केलं. कोण आहे ती? जाणून घेऊया...
2 / 8
पत्रकारितेनंतर अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणारी ही नायिका म्हणजे मुग्धा कर्णिक आहे.
3 / 8
सध्या मुग्धा कर्णिक पारु या मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेत तिने साकारलेलं अहिल्यादेवी किर्लोस्कर नावाचं पात्र अनेकांच्या पसंतीस उतरलं आहे.
4 / 8
अहिल्यादेवी किर्लोस्करांच्या भूमिकेतून तिनं प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली आहे. करारी नजर, कठोर स्वभाव हे अहिल्यादेवींच वैशिष्ट्य आहे.
5 / 8
मुग्धा कर्णिक एकेकाळी टीव्हीसाठी अँकरिंगचं काम करायची, अलिकडेच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या करिअरविषयी खुलासा केला आहे.
6 / 8
या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली,'माझे बाबा हे स्पोर्ट्स जर्नलिस्ट आहेत. त्यामुळे लहानपणापासून घरी स्पोर्स्टचं वातावरण होतं. मला काही कळायचं नाही पण बाबा मला ते सगळं समजवायचे. मी कॉलेज केल्यानंतर सुरुवातीला नाटकांमध्ये काम केलं. मग वाटलं की हे फिल्ड अनस्टेबल आहे. त्यामुळे मी जर्नलिसम करण्याचा निर्णय घेतला.तेव्हा मी एका इन्स्टिट्यूटमधून मी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं.'त्यावेळी मुग्धाने आयबीएन लोकमतमध्ये इंटर्नशिप केली होती, असं सांगितलं.
7 / 8
मग ती म्हणाली,'मी आधी मनोरंजन डिपार्टमेन्टला होते. पण,त्याचवर्षी आयपीएल सुरु झालं.त्याचवर्षी आयपीएलचा पहिला सीझन सुरु झाला होता आणि मंदिर बेदी होस्ट करायची. तर मग तेव्हा आम्ही पण तो प्रयोग केला. मी आणि आणखी एक असं आम्ही दोघी हे काम पाहायचो. मलाही यामध्ये रस होतो. त्यामुळे मग मी स्पोर्टस कव्हर करण्याचा निर्णय घेतला.जवळपास २ वर्ष मी ते काम केलं आहे. त्याच्यानंतर मी एका एनजीओमध्ये देखीस काम केलं.'
8 / 8
मुग्धा कर्णिकने याआधी 'झिम्मा', 'स्वाभिमान',' होम स्वीट होम' या मालिका, नाटक तसेच चित्रपटांमधून काम केलं आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया