साखरपुड्याची वर्षपूर्ती! 'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो; कॅप्शन चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 12:29 IST
1 / 8अगदी अलिकडेच एप्रिल महिन्यात त्यांनी लग्न करून नव्या आयुष्याला सुरुवात केली. 2 / 8गतवर्षी आजच्याच दिवशी शुभंकर आणि अमृताचा साखरपुडा झाला होता. 3 / 8थोरामोठ्यांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला होता.4 / 8यानिमित्ताने अमृता बनेने सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे काही UNSEEN फोटो पोस्ट केले आहेत.5 / 8'२७-११-२०२३, साखरपुडा एक वर्ष!' असं कॅप्शन देत तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याचे पाहायला मिळत आहेत. 6 / 8अभिनेत्रीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.7 / 8दरम्यान अमृता-शुभंकरबद्दल सांगायचं झालं तर, सध्या अमृता स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काम करताना दिसते आहे.8 / 8तर शुभंकर एकबोटे हा सुद्धा एका उत्तम अभिनेता आहे. दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा तो मुलगा आहे. शिवाय 'कन्यादान' मालिकेत त्याने अमृतासोबत स्क्रीन शेअर केली होती.