वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 10:00 IST
1 / 9पुण्यात गुरुवारी(१३ नोव्हेंबर) संध्याकाळी नवले ब्रीजवर झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एका मराठी अभिनेत्याने जीव गमावला आहे. 2 / 9नवले पुलावर झालेल्या अपघातात ३० वर्षीय अभिनेता धनंजय कोळीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 3 / 9धनंजय हा मुळचा कोल्हापूरातील जयसिंगपूर येथील होता. गेल्या ५ वर्षांपासून तो आपल्या कुटुंबीयांसह चिखली येथे स्थायिक झाला होता. 4 / 9काही मराठी नाटकांमध्ये त्याने काम केलं होतं. तर त्याचा कार चालकाचा व्यवसायही होता. 5 / 9गुरुवारी धायरीतील नवलकर कुटुंब देवदर्शनासाठी नारायणपूरला देवदर्शनासाठी गेले होते. त्यांनी ओळखीच्या असलेल्या धनंजयला त्याची गाडी घेऊन येण्यास विनंती केली होती. 6 / 9देवदर्शन करून परत येत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं. या भीषण अपघातात धनंजयसह मोक्षिता रेड्डी, स्वाती नवलकर, दत्तात्रय दाभाडे आणि शांता दाभाडे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.7 / 9धनंजय याचं दोन वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. तीन महिन्यापूर्वीच धनंजय बाबा झाला होता. धनंजयच्या मृत्यूने ३ महिन्याच्या बाळावरुन वडिलांचं छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 8 / 9धनंजयच्या निधनाने त्यांच्या ६१ वर्षीय वडिलांवर आणि ५२ वर्षीय आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील आधारस्तंभ हरवल्याने कुटुंब हतबल झाले आहे. 9 / 9धनंजयच्या पश्चात पत्नी, अडीच महिन्यांचा मुलगा, आई-वडील असा परिवार आहे, तसेच त्यांच्या दोन विवाहित बहिणी भावाच्या प्रेमाला मुकल्याने संपूर्ण कुटुंब शोकात बुडाले आहे.