Join us
Daily Top 2Weekly Top 5

३७ व्या वर्षी 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होणार आई! खास अंदाजात केलं फोटोशूट, फ्लॉन्ट केला बेबी बंप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:59 IST

1 / 7
कुणी नवं घर घेतलं तर कुणी गाडी, तर काहींनी लग्न करत नव्या आयुष्याची सुरुवात केली. त्याचबरोबर काही कलाकारांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं.
2 / 7
अशातच अलिकडेच टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीने सुरभी जोतीने ती प्रेग्नंट असल्याची खुशखबर चाहत्यांना दिली.सोशल मीडियावर खास अंदाजात तिने पोस्ट शेअर गोड बातमी सांगितली.
3 / 7
सुरभी जोतीने २७ ऑक्टोबर २०२४ रोजी अभिनेता सुमित सूरीबरोबर लग्नगाठ बांधली. सुरभी व सुमित यांचा शाही विवाह सोहळा उत्तराखंडच्या जिम कॉर्बेटमधल्या आहाना रिसॉर्टमध्ये मोठ्या दणक्यात पार पडला. आता लग्नाच्या दीड वर्षांनी या कपलच्या आयुष्यात नव्या सदस्याचं आगमन होणार आहे.
4 / 7
नुकतेच सुरभीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अतिशय स्टायलिश अंदाजात तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
5 / 7
तिच्या या खास फोटोशूटचं चाहते भरभरून कौतुक करत आहेत. या लेटेस्ट फोटोशूटसाठी अभिनेत्रीने फिकट हिरव्या रंगाचा आउटफिट परिधान केला आहे.तसेत हातात सूर्यफुल घेत फोटोशूटसाठी एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत.
6 / 7
'Unfolding like a wild flower...', असं सुंदर कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
7 / 7
दरम्यान, सोशल मीडियावर सुरभीचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत असून त्यांना चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय. हिंदी मालिकाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमे्ंट्स करत अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडियाव्हायरल फोटोज्