Join us

कधीकाळी मलायका, प्रियंकाच्या मागेपुढे फिरायची, अशी बनली अभिनेत्री..., वाचा, येशाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 07:00 IST

1 / 8
मलायका अरोरा व प्रियंका चोप्राच्या व्हॅनिटी बाहेर उभी राहणारी, स्टायलिस्ट म्हणून त्यांच्या मागेपुढे करणारी एक मुलगी अभिनेत्री बनेल, असा विचारही केला नव्हता. पण आज ती टीव्ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे नाव येशा रूघानी.
2 / 8
‘मुस्कान’ या 2018 साली प्रसारित मालिकेत येशा व शरद मल्होत्रा यांची जोडी चांगलीच गाजली होती.
3 / 8
येशा अभिनेत्री कशी झाली, याची कहाणी फारच इंटरेस्टिंग आहे. तिने कधीच अभिनेत्री व्हायचे स्वप्न पाहिले नव्हते. फॅशन स्टायलिस्ट म्हणून ती आपल्या कामात खूश होती.
4 / 8
प्रियंका चोप्रा, मलायका अरोरा यांच्याशिवाय तमन्ना भाटिया, आलिया भट, माधुरी दीक्षित, इशा गुप्ता यांची स्टायलिस्ट म्हणून तिने काम केले आहे. या अभिनेत्रींच्या व्हॅनिटी बाहेर ती अनेक तास उभी राहायची.
5 / 8
पण हो, एक दिवस आपलीही अशी व्हॅनिटी व्हॅन असावी, हे स्वप्नं तिच्या मनाच्या कप्प्यात कुठेतरी जिवंत होते.
6 / 8
या येशाला अभिनेत्री होण्याची संधी कशी मिळाली तर एका आजारी महिलेची मदत केल्यामुळे.
7 / 8
होय, एक दिवस एक आजारी महिला तिला भेटली. येशाने तिला मदत केली. ती त्या आजारी महिलेला सोडायला तिच्या घरी गेली आणि इथे त्या आजारी महिलेच्या मुलीशी तिची भेट झाली. योगायोगाने ती होते येशाच्या पहिल्या डेब्यू शोची प्रोड्यूसर.
8 / 8
त्या आजारी महिलेच्या मुलीने येशाला ऑडिशनसाठी बोलावले. येशाला आधी विश्वास बसला नाही. पण तिने हे आॅडिशन दिले आणि या ऑडिशनने तिचे विश्वचं बदलले. येशाला ‘जीत गई तो पिया मेरे’ हा शो मिळाला. इतकेच नाही ती या शोची लीड हिरोईन बनली.
टॅग्स :टेलिव्हिजन