By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:46 IST
1 / 8सध्या मराठी कलाविश्वात सनई चौघडे वाजत आहेत. अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढले आहेत. आता आणखी एका मराठी अभिनेत्याची लगीनघाई सुरू आहे. 2 / 8अभिनेता सिद्धार्थ किरीद लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने सोशल मीडियावरुन प्रेमाची कबुली दिली होती. 3 / 8आता सिद्धार्थने होणाऱ्या बायकोसोबत खास प्री वेडिंग फोटोशूट केलं असून याचे फोटो शेअर केले आहेत. 4 / 8या फोटोशूटसाठी सिद्धार्थ शर्ट, जॅकेट आणि पँट असा खास लूक केला होता. तर त्याची होणारी पत्नी मैथिली हिने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता. 5 / 8सिद्धार्थ आणि मैथिलीने फोटोसाठी खास पोझही दिल्याचं दिसत आहे. त्यासोबतच खास अंदाजात त्यांनी वेडिंग डेटही जाहीर केली. 6 / 8सिद्धार्थ आणि मैथिली येत्या २३ जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 7 / 8त्यांच्या फोटोंवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनीही त्यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 8 / 8सिद्धार्थने फ्रेशर, मुरांबासारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.