Join us

आणखी एका मराठी कलाकाराच्या घरी हलणार पाळणार; 'हे मन बावरे'फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 11:30 IST

1 / 11
गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी पालक झाले आहेत. अलिकडेच मिनाक्षी राठोड आणि मृणाल दुसानीस या दोन्ही अभिनेत्रींना त्यांच्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर आता पुन्हा एका अभिनेत्रीने गुडन्यूज दिली आहे.
2 / 11
सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेतील एक लोकप्रिय अभिनेत्री लवकरच आई होणार आहे.
3 / 11
अभिनेत्री सायली परब लवकरच आई होणार असून तिने ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
4 / 11
सायलीने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो शेअर केले आहेत.
5 / 11
या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर कमालीचा ग्लो दिसत असून आई होणार या भावनेमुळे ती खूश असल्याचं दिसून येत आहे.
6 / 11
सायली मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
7 / 11
सायलीने इंद्रनील परबसोबत लग्न केलं असून या लग्नाचे अनेक फोटोही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
8 / 11
सायलीने तू सौभाग्यवती हो, हे मन बावरे या मालिकांसह , हुतात्मा या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.
9 / 11
शांत स्वभाव आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर सायलीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.
10 / 11
सायलीने अनेक गाजलेल्या मालिका, वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती सेटवरचे फोटो शेअर करत असते.
11 / 11
सायली आणि इंद्रनील यांच्या साखरपुड्यातील एक सुंदर फोटो
टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन