'कारभारी लयभारी'फेम अभिनेत्रीला मिळाला रिअल लाइफ कारभारी; थाटात पार पडला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 18:43 IST
1 / 9छोट्या पडद्यावर विशेष गाजलेली लोकप्रिय मालिका म्हणजे कारभारी लयभारी. ही मालिका संपून बरेच दिवस झाले. मात्र, त्यातील कलाकारांची कायम चर्चा रंगत असते.2 / 9सध्या सोशल मीडियावर या मालिकेतील रश्मी पाटील हिची चर्चा रंगली आहे. कारभारी लयभारी या मालिकेत शोना मॅडमची भूमिका साकारुन रश्मी चर्चेत आली.3 / 9या मालिकेनंतर रश्मी फारशी कोणत्या मालिकांमध्ये दिसली नाही. मात्र, सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 4 / 9रश्मीचा नुकताच साखरपुडा झाला असून तिने या साखरपुडा समारंभाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.5 / 9रश्मीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय असं आहे. अक्षयसोबत रश्मीने बरेच रोमॅण्टिक फोटो शेअर केले आहेत.6 / 9रश्मीने मालिकांसह सिनेमा आणि वेबसीरिजमध्येही काम केलं आहे.7 / 9इंद्रभुवन या सिनेमात रश्मी झळकली आहे. तर, एक गाव बारा भानगडी या सीरिजमध्येही ती दिसली होती.8 / 9रश्मीने तिच्या साखरपुड्यासाठी खास अंगठी डिझाइन केली होती.9 / 9रश्मी आणि तिच्या नवऱ्याचा रोमॅण्टिक फोटो