Join us

"हम साथ साथ है", 'लग्नाची बेडी' मालिकेतील कलाकारांचं रियुनियन; शेअर केले खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 10:38 IST

1 / 7
तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जुन्या मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत.
2 / 7
अलिकडेच स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेने जवळपास ५ वर्षानंतर प्रेक्षकांचा निरोप घेतला.
3 / 7
त्यानंतर आता स्टार प्रवाह वाहिनीवरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका म्हणजे 'लग्नाची बेडी' आहे.
4 / 7
३१ जानेवारी, २०२२ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत सायली देवधर सिंधूची, तर मधुराणी ही भूमिका रेवती लेले साकारत आहे तर संकेत पाठक राघवच्या भूमिकेत पाहायला मिळाला.
5 / 7
दोन वर्षांहून जास्त काळ या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यानंतर आता ही मालिका बंद होत आहे.
6 / 7
दरम्यान, नुकतेच या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर त्याचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये 'लग्नाची बेडी' मालिकेतील संपूर्ण स्टारकास्ट ट्रिपला गेलेली पाहायला मिळते आहे.
7 / 7
अभिनेत्री सायली देवधरने सोशल मीडियावर त्यांच्या रियुनियने फोटो पोस्ट केले आहेत. 'हम साथ साथ है...'असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया