'काजळमाया'त चेटकीण, पण प्रत्यक्षात आहे भलतीच ग्लॅमरस; अभिनेत्रीचे फोटो पाहून प्रेमात पडाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:37 IST
1 / 7स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच 'काजळमाया' ही हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2 / 7या बहुचर्चित मालिकेत अभिनेता अक्षय केळकर, वैष्णवी कल्याणकरसह एक नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 3 / 7'काजळमाया' मध्ये प्रेक्षकांना चेटकीणीच्या वंशातील विलक्षण सुंदर असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट पाहायला मिळणार आहे.4 / 7'काजळमाया' मालिकेतून अभिनेत्री रुची जाईल टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत ती चेटकीणीच्या भूमिकेत दिसणार आहे.5 / 7 पडद्यावर पर्णिका नावाच्या चेटकीणीची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस दिसते.6 / 7रुची सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून त्याद्वारे फोटो,व्हिडीओ शेअर करत असते. तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहून याची प्रचिती येईल. 7 / 7येत्या २७ ऑक्टोबरपासून रुची जाईलची काजळमाया ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.