Join us

'थोडं तुझं आणि थोडं माझं' मधील साधी, सोज्वळ आभा खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस; प्रभूंच्या लेकीचं फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 15:48 IST

1 / 7
अलिकडेच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु झालेल्या 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
2 / 7
अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे यांची मालिकेत मुख्य भूमिका आहे. त्यांनी साकारलेली मानसी-तेजसची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
3 / 7
याशिवाय मालिकेतील इतर कलाकारांनी देखील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
4 / 7
अशातच 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मानसीच्या नंदेचं पात्र साकारणारी अभिनेत्री सखी गुंडे तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
5 / 7
मालिकेत साधी, सोज्वळ दिसणारी प्रभूंची लेक आभा खऱ्या आयुष्यात फारच सुंदर दिसते.
6 / 7
नुकतेच सोशल मीडियावर सखीने तिचे तपकिरी रंगाच्या गाऊनमधील खास फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
7 / 7
'Simple yet Stunning...' असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिचे हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
टॅग्स :टिव्ही कलाकारसोशल मीडियाव्हायरल फोटोज्