By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 16:21 IST
1 / 7छोट्या पडद्यावरील 'लक्ष्मी निवास' ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. या कौंटुबिकम मालिकेत अनेक लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते आहे.2 / 7 'लक्ष्मी निवास' मालिकेतील भावना,सिद्धू, लक्ष्मी, श्रीनिवास, जान्हवी, वेंकी आणि वीणा,जयंत ही पात्रे घराघरात पोहोचली आहेत. 3 / 7 'लक्ष्मी निवास' मालिकेत जान्हवी ही भूमिका अभिनेत्री दिव्या पुगांवकरने साकारली आहे. तिच्या या भूमिकेला देखील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 4 / 7 सध्या ही अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. मालिकेत साधी आणि सोज्वळ दिसणारी जान्हवी खऱ्या आयुष्यात फारच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.5 / 7अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो पाहून कोणाचीही नजर हटणार नाही.6 / 7 समुद्रकिनारी एकापेक्षा एक हटके पोज देत दिव्याने हे फोटो क्लिक केले आहेत. 7 / 7दिव्या पुगांवकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने या आधी 'मुलगी झाली हो','मन धागा धागा जोडते नवा' 'प्रेमा तुझा रंग कसा' आणि 'विठुमाऊली' या मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, 'मुलगी झाली हो'मालिकेने तिला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली.