'लागिरं झालं जी' मालिकेतील जयडी आठवतेय? आता दिसते फारच सुंदर, 'या' नव्याकोऱ्या मालिकेतून येतेय भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:03 IST
1 / 8 झी मराठीवरील 'लागीरं झालं जी' ही मालिका अगदी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली होती. या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात घर केलं.2 / 8 झी मराठीवरील 'लागीरं झालं जी' ही मालिका अगदी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली होती. या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात घर केलं.3 / 8आजही ही मालिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. याच मालिकेत जयडीची भूमिका साकारुन अभिनेत्री किरण धाने नावारुपाला आली. किरण ढाणेने जयश्री पात्र साकारून एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. त्यामुळे तिला चांगलीत लोकप्रियता मिळाली. 4 / 8या मालिकेनंतर किरण 'उदे गं अंबे उदे', 'एक होती राजकन्या' यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. दरम्यान, लागिरं झालं जी मालिकेत साधा ड्रेस आणि वेणी घालून वावरणारी ही नायिका आता फारच सुंदर दिसते. 5 / 8 किरण सोशल मीडियावर तिचे फोटो,व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या ही अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.6 / 8 किरण धाने लवकरच स्टार प्रवाहच्या वचन दिले तू मला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.7 / 8 मिलिंद गवळी,अनुष्का सरकटे तसेच इंद्रनील कामत यांसारख्या कलाकारांच्या मालिकेत भूमिका आहेत. 8 / 8 'वचन दिले तू मला' मध्ये ती दिव्या जहागिरदार हे पात्र साकारणार आहे.