Join us

कृष्णा इतकीच सुंदर! 'हळद रुसली कुंकू हसलं' मधील दुष्यंतच्या रिअल लाईफ पत्नीला पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 17:42 IST

1 / 7
छोट्या पडद्यावरील हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
2 / 7
या मालिकेत अभिनेता अभिषेक रहाळकरने दुष्यंत नावाची मुख्य भूमिका साकारली आहे. तर त्याच्यासोबत अभिनेत्री समृद्धी केळकर देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
3 / 7
समृद्धीने या मालिकेमध्ये कृष्णा हे पात्र साकारलं आहे. सध्या हळद रुसली कुंकू हसलं मध्ये दुष्यंत आणि कृष्णाची लगीनघाई सुरु असल्याचा ट्रॅक दाखवण्यात येत आहे.
4 / 7
मालिकेत या रिल लाईफ जोडीला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. मात्र, तुम्हाला माहितीये का? अभिषेक रहाळकर खऱ्या आयुष्यात विवाहित आहे.
5 / 7
अलिकडेच जानेवारीमध्ये अभिषेक रहाळकर लग्नबंधनात अडकला. कृतिका कुलकर्णी असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. अभिनेत्याची पत्नी कलाविश्वापासून दूर आहे.
6 / 7
दरम्यान, अभिषेक रहाळकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर स्टार प्रवाहवरील 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेतून तो चांगलाच प्रसिद्धीझोतात आला.
7 / 7
त्याचबरोबर त्याने 'तू तेव्हा तशी' मालिकेतही काम केलं आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया