कार विकली, मित्राकडून प्रेरणा घेऊन मुंबईत रिक्षा चालवते 'ही' मराठी अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 16:04 IST
1 / 8अनेकजण आपली मूळ नोकरी करत काही ना काही व्यवसायही करतात. एक मराठी अभिनेत्री जी अभिनयासोबत रिक्षा चालवण्याचं काम करते हे माहितीये का?2 / 8एक अशी मराठी अभिनेत्री आहे जी मुंबईत रिक्षा चालवते. काही वर्षांपूर्वी कार विकून तिने रिक्षा खरेदी केली. आता कुठेही जाण्यासाठी ती स्वत: रिक्षा चालवतच जाते.3 / 8ही अभिनेत्री आहे यशश्री मसुरकर. ३८ वर्षीय यशश्रीला 'टुकटुक रानी'ही म्हणतात. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये यशश्री सहभागी झाली होती.4 / 8यशश्रीला एका मित्रामुळे कल्पना सुचली. ती एका मुलाखतीत म्हणालेली, 'माझा डेन्मार्कचा मित्र सायकल चालवत भारतात आला होता. यासाठी त्याला ५०० दिवस लागले. मला त्यापासूनच प्रेरणा मिळाली. मग मी रिक्षाने मुंबई ते आग्रा प्रवास केला होता.'5 / 8'रिक्षा चालवायला लागल्यापासून मला आता मी आणखी स्ट्राँग असल्याची जाणीव झाली. आता ही रिक्षा माझ्या आयुष्याचा भाग झाली आहे. आता मी गाडी नाही तर स्वत:साठीच रिक्षा चालवते.'6 / 8'रिक्षा चालवताना मी प्रवासी तर घेतेच. पण ऑडिशन्स, शूटलाही मी रिक्षाने जाते' असंही ती एका मुलाखतीत म्हणाली होती. यशश्रीच्या सोशल मीडियावर कायम तिचे रिक्षा चालवतानाचे व्हिडीओ बघायला मिळतात.7 / 8'रिक्षा घेतल्यापासून माझे पैसे आणि वेळ या दोन्ही गोष्टी वाचतात. माझ्याकडे कार होती. पण मला कार चालवता येत नव्हती. म्हणून मला ड्रायव्हरवर विसंबून राहावे लागत असे. त्यामुळे मी कार विकून रिक्षा घेतली आणि रिक्षा चालवत मीच सगळीकडे जायला लागले, असंही तिने मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती.8 / 8यशश्रीने 'लक्ष्मण रेषा' मराठी मालिकेत काम केलं होतं. नंतर ती 'रंग बदलती ओढणी', 'चंद्रगुप्त मौर्य' हिंदी मालिकांमध्ये दिसली. तसंच ती स्वप्नील जोशीच्या 'लाल इश्क'सिनेमात दिसली होती.