Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबी लेहेंग्यात दिसतेय क्युट, आज मराठी टीव्हीवरील आदर्श सून; कोण आहे ही अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 11:32 IST

1 / 8
मराठी कलाकारांचे बालपणीचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. आज कलाविश्वात प्रसिद्ध असलेले हे चेहरे लहानपणी कसे दिसायचे हे बघण्यात चाहत्यांना रस असतो.
2 / 8
या चिमुकलीचा फोटो पाहून तुम्ही या अभिनेत्रीला ओळखू शकता का? मालिकाविश्वातील आदर्श सून म्हणून ही अभिनेत्री प्रसिद्ध आहे.
3 / 8
गुलाबी रंगाच्या लेहेंग्यातील ही गोंडस मुलगी कोण आहे? एका मालिकेमुळे तिला मराठी टीव्हीविश्वात कमालीची प्रसिद्धी मिळाली. तिच्या अभिनयावर, सौंदर्यावर चाहते फिदा आहेत.
4 / 8
सोशल मीडियावर तर तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे. तिचे स्पष्ट विचार ऐकून ती किती समजुतदार आहे याचा प्रत्यय येतो. आयुष्याबद्दल बोलणारे आणि सर्वांना प्रेरित करणारे तिचे अनेक रील्स व्हायरल झाले आहेत.
5 / 8
तर ही अभिनेत्री आहे सर्वांची लाडकी तेजश्री प्रधान. 'होणार सून मी या घरची' मालिकेने तिला प्रसिद्धी मिळाली. इतकंच नव्हे तर ती महाराष्ट्राची लाडकी आणि आदर्श सून बनली.
6 / 8
या मालिकेआधी तिने 'झेंडा' या चित्रपटात काम केले होते. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता या मालिकेने मिळवून दिली.
7 / 8
नंतर ती हिंदी प्रोजेक्टमध्येही दिसली. काही काळ मराठी सिनेमे केल्यानंतर ती पुन्हा मालिकाविश्वात परतली. 'अग्गंबाई सासूबाई','प्रेमाची गोष्ट' या मालिकांमध्येही तिची भूमिका गाजली.
8 / 8
सध्या तेजश्री 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत दिसत आहे. सुबोध भावेसोबत तिची रोमँटिक लव्हस्टोरी गाजत आहे.
टॅग्स :तेजश्री प्रधान मराठी अभिनेताव्हायरल फोटोज्टेलिव्हिजन