1 / 6लेह-लडाखमध्ये फिरायला जाणं म्हणजे निसर्गाचा सुखद अनुभव घेणं आहे. तिथले नयनरम्य दृश्य कायम मनात साठवण्यासारखे असतात. मराठी अभिनेत्री सध्या लेह-लडाखमध्ये फिरण्याचा आनंद लुटत आहे.2 / 6ही अभिनेत्री आहे सुखदा खांडकेकर (Sukhada Khandkekar). सुखदा आणि अभिजीत दोघंही नवरा बायको लडाखला फिरायला गेले आहेत. त्यांनी तिथले काही फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत.3 / 6दरम्यान सुखदाने गुलाबी साडीत खास फोटोशूट केलं आहे. मागे निसर्गाचा सुंदर नजारा दिसतोय तर समोर ती गुलाबी साडीत उभी आहे. पदर वाऱ्यावर उडताना तिने छान पोज दिली आहे.4 / 6सुखदाच्या गुलाबी साडीवर फुलांची आकर्षक डिझाईन आहे. यावर तिने पांढरा ब्लाऊज घातला आहे. तसंच साजेशी नाजूक ज्वेलरी परिधान केली आहे. तसंच तिचा मेकअप चेहऱ्यावर आणखी ग्लो आणत आहे.5 / 6लडाखमधील एका ठिकाणी झाडाखाली तिने काही फोटो काढले आहेत. झाडावरील टवटवीत फुलं आणि सुखदाचं सौंदर्य एकरुप झालेलं दिसत आहे. 6 / 6एखाद्या चित्रकाराने कागदावर रेखाटावं असंच हे खरोखरचं दृश्य आहे. सुखदाच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या सौंदर्याचं आणि या नजाऱ्याचं कौतुक केलं आहे.