By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 15:55 IST
1 / 10स्रेहलता वसईकर ही प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री. कधी स्वराज्यरक्षक संभाजी, अहिल्या मालिकेतील ऐतिहासिक भूमिका तर कधी ‘अनुराधा’ सिरीजमध्ये साकारलेली जिगरबाज लेडी पोलीस ऑफिसर अशा वेगवेगळ्या रूपात तुम्ही तिला पाहिलं असेल. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम) 2 / 10स्रेहलता वसईकर ही एक गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्री. विशेषत: ऐतिहासिक भुमिकांसाठी खास ओळखली जाणारी. सध्या तिचं एक फोटोशूट चर्चेत आहे.3 / 10होय, स्रेहलताने साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोशूटवर चाहते फिदा झाले आहेत. हे फोटो एका कार्यक्रमातील आहेत.4 / 10‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेत स्रेहलताने साकारलेली सोयरा बाईसाहेब ही भूमिका प्रचंड गाजली होती.5 / 10मागच्या काही दिवसांत स्रेहलताचे बोल्ड फोटो चर्चेत होते. यावरून अनेकांनी तिला ट्रोलही केलं होतं.6 / 10स्रेहलता सोशल मीडियावर सतत स्वत:चे ग्लॅमरस, बोल्ड फोटो शेअर करत असते. यावरून ती अनेकदा ट्रोलही होते. पण स्नेहलताला यामुळे फरक पडत नाही.7 / 10 मी एक कलाकार आहे आणि माझं एक खासगी आयुष्य सुद्धा आहे... मी रील आणि रिअल लाईफ ही वेगवेगळी ठेवणच पसंत करते ..., अशी तिची भूमिका आहे आणि त्यामुळे जग काय म्हणेल याची तिला अजिबात पर्वा नाही.8 / 10स्रेहलताने ‘फू बाई फू’मधून तिच्या अभिनयाच्या कारकिदीर्ला सुरुवात केली. मात्र, ऐतिहासिक भूमिकांमुळे तिला खरी लोकप्रियता मिळाली. 9 / 10स्नेहलताने मराठीसह हिंदी ऐतिहासिक मालिकांमध्येही काम केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई, स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकांमध्ये ती झळकली आहे.10 / 10स्नेहलताने संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात भानू ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचंही चांगलंच कौतुक करण्यात आलं होतं.