Join us

PHOTO: शिवानी-अंबरचे कपल गोल्स; नव्या रोमॅन्टिक फोटोशूटची सोशल मीडियावर होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:33 IST

1 / 7
अभिनेत्री शिवानी सोनार आणि अंबर गणपुळेच्या लग्नाची मराठी कलाविश्वात चांगलीच चर्चा रंगली.
2 / 7
दरम्यान, २१ जानेवारी २०२५ ला या दोघांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. मोठ्या थाटामाटात अंबर-शिवानीचा विवाहसोहळा पार पडला.
3 / 7
मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकार मंडळींनी त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.
4 / 7
आता पुन्हा एकदा या कपलची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अंबर आणि शिवानीने नुकतंच एक रोमॅन्टिक फोटोशूट केलं आहे. हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याचे पाहायला मिळत आहेत.
5 / 7
'श्री व सौ...!' असं कॅप्शन देत त्यांनी हे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
6 / 7
शिवानीने या फोटोशूटसाठी केशरी रंगाची सुंदर साडी नेसली आहे. तर अंबरने अबोली रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.
7 / 7
फोटोंमधील शिवानी-अंबरचा रोमॅन्टिक अंदाज पाहून नेटकऱ्यांनी पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स करत त्यांचं कौतुक केलं आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया