Join us

रेश्मा शिंदेचं पतीसोबत देवदर्शन, अभिनेत्रीच्या सुंदर मंगळसूत्राने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 13:49 IST

1 / 7
रेश्मा शिंदे हा मराठी टेलिव्हिजनवरचा लोकप्रिय चेहरा आहे. रंग माझा वेगळा, घरोघरी मातीच्या चुली, लगोरी अशा मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
2 / 7
काही महिन्यांपूर्वीच रेश्मा शिंदेने साउथ इंडियन असलेल्या पवनशी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली.
3 / 7
सध्या रेश्मा पती आणि कुटुंबीयांसोबत क्वालिटी टाइम घालवत आहे. रेश्माने पतीसोबत कर्नाटकामधील उडपी येथील कृष्णाच्या मंदिरात दर्शन घेतलं.
4 / 7
याचे फोटो रेश्माने तिच्या अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. पैठणी साडी नेसून रेश्माने पारंपरिक लूक केल्याचं दिसत आहे.
5 / 7
या सगळ्यात अभिनेत्रीच्या मंगळसूत्राने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रेश्माने साडीवर तिचं मंगळसूत्र फ्लॉन्ट केलं आहे.
6 / 7
मोजकेच काळे मणी असलेल्या या मंगळसूत्राला खड्यांचं पेंन्डंट आहे. रेश्माचं हे नाजूक मंगळसूत्र खूप उठून दिसत आहे.
7 / 7
रेश्माच्या या फोटोंवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत.
टॅग्स :रेश्मा शिंदेटिव्ही कलाकार