Join us  

'लेडी बॉस' अंदाजात प्रिया मराठेचा हटके स्वॅग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 3:56 PM

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया मराठे. उत्तम अभिनयकौशल्याच्या जोरावर तिने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.
2 / 8
आजवरच्या कारकिर्दीत प्रियाने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. या सुखांनो या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर ती चार दिवस सासूचे या मालिकेत झळकली.
3 / 8
तू तिथे मी या मालिकेत प्रियाने साकारलेल्या निगेटिव्ह भूमिकेलाही प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.
4 / 8
प्रिया सोशल मीडिायवर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांसोबत तिच्याशी निगडीत गोष्टी शेअर करत असते.
5 / 8
प्रियाने कसम से या मालिकेतून हिंदी मालिकांमध्ये पदार्पण केले. मात्र 'पवित्र रिश्ता' मालिकेतील भूमिकेमुळे ती घराघरात पोहचली. 'बडे अच्छे लगते' है, कॉमेडी सर्कसमध्येही ती झळकली.
6 / 8
अलिकडेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात ती लेडी बॉसच्या अंदाजात दिसून येत आहे.
7 / 8
प्रियाने काही हटके पोझ देत हे फोटोशूट केलं आहे. प्रियाच्या या फोटोला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.
8 / 8
प्रिया मराठीतली लोकप्रिय अभिनेत्री असून तिचा नवरादेखील प्रसिद्ध अभिनेता आहे. प्रियाने अभिनेता शंतनू मोघे याच्यासोबत लग्न केलं आहे. शंतनू आई कुठे काय करते या मालिकेत
टॅग्स :प्रिया मराठेटेलिव्हिजनसेलिब्रिटीसिनेमा