मराठीतली करीना कपूर! वयाच्या चाळीशीतही टीव्हीवरील खलनायिकेचा कमालीचा फिटनेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 11:17 IST
1 / 7वयाची चाळीशी ओलांडली तरी करीना कपूरच्या फिटनेसची आणि तिच्या तजेलदार त्वचेची नेहमी स्तुती होते. करीना दोन मुलांची आई आहे. मराठीतही अशी एक अभिनेत्री आहे जी तिला टक्कर देते.2 / 7ही अभिनेत्री आहे माधवी निमकर (Madhavi Nemkar). वयाच्या ४१ व्या वर्षीही माधवीचं सौंदर्य, तिचा फिटनेस कमालीचा आहे.3 / 7माधवीने नुकतेच ब्राऊन रंगाच्या लॉन्ग मोनोकॉनी ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. या टर्टलनेक आऊटफिटमध्ये तिने टोन्ड फिगर फ्लॉन्ट केली आहे. 4 / 7कानात आणि हातात गोल्डन अॅक्सेसरीज घालत तिने लूक पूर्ण केला आहे. तसंच तिची स्टायलिश हेअरस्टाईलही लक्ष वेधून घेत आहे. 5 / 7या आऊटफिटवर तिने तसाच ग्लॅमरस मेकअपही केला आहे. या वेस्टर्न लूकवर माधवीचे चाहते घायाळ झाले आहेत. 6 / 7माधवीच्या सोशल मीडियावर पाहिलं तर तिने याआधीही बरेचदा ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. नुकतीच ती 'शिट्टी वाजली रे' कार्यक्रमात आली होती. त्यासाठी तिने हा खास लूक केला होता.7 / 7माधवी २०१४ साली विक्रांत कुलकर्णी यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली. विक्रांत मोठे व्यावसायिक आहेत. त्यांना एक मुलगा आहे.