Join us

IPL : मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटर्सला फिटनेसचे धडे देतो प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा नवरा, तुम्ही ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:48 IST

1 / 7
सध्या सगळीकडे आयपीएलचा फिव्हर आहे. पण, यंदाच्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सला सातत्याने पराभवाला सामोरं जावं लागत आहे.
2 / 7
या मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये प्रसिद्ध अभिनेत्रीचा नवरादेखील आहे. पण अभिनेत्रीचा नवरा हा खेळाडू नसून फिटनेस कोच आहे.
3 / 7
हा दुसरा तिसरा कोणी नसून लोकप्रिय अभिनेत्री काजल काटे हिचा नवरा आहे. त्याचं नाव प्रतिक कदम असं आहे.
4 / 7
प्रतिक मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना फिटनसचे धडे देतो. त्याने अनेक फोटोही त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.
5 / 7
प्रतिक आणि काजलची भेट एका मेट्रोमोनियल साइटवर झाली होती. त्यानंतर ते एकमेकांना भेटले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.
6 / 7
प्रतिक आणि काजलचं लग्न झालं आणि लग्नानंतर लगेचच त्याला मुंबई इंडियन्सकडून ऑफर आली.
7 / 7
दरम्यान, काजलने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ'मुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती.
टॅग्स :टिव्ही कलाकारआयपीएल २०२४मुंबई इंडियन्स