Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तू ही रे माझा मितवा' मालिकेतील अर्णव खऱ्या आयुष्यात 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? 'ती' दिसते फारच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:34 IST

1 / 7
'तू ही रे माझा मितवा' मालिका ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असणारी मालिका आहे. या मालिकेतील अर्णव-ईश्वरीच्या जोडीला प्रेक्षक भरभरुन प्रेम मिळतंय. या दोघांची प्रेम कहाणी थोडी हटके आहे.
2 / 7
एकमेकांच्या प्रेमात ते जितके बुडाले आहेत तितकेच ते एकमेकांचा तिरस्कारही करतात. या मालिकेत अभिनेता अभिजीत आमकर आणि शर्वरी जोगची मुख्य भूमिका आहे.
3 / 7
पण, अभिजीतची खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण आहे, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
4 / 7
अभिजीत आमकर खऱ्या आयुष्यात लोकप्रिय अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरला डेट करत असल्याची चर्चा आहे.
5 / 7
सोशल मीडियावर नक्षत्रा अनेकदा अभिजीतसोबतचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या शेअर केरत असल्याची पाहायला मिळते. दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवरचं प्रेमही व्यक्त केलं आहे. याशिवाय जवळच्या मित्र मैत्रिणींनी देखील या फोटोवरून त्यांच्यात प्रेम असल्याचा खुलासा केला आहे.
6 / 7
नक्षत्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तिने 'लेक माझी लाडकी', 'चंद्र आहे साक्षीला' यांसारख्या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्याचबरोबर ती 'प्रितम', 'फतेशिकस्त', 'सापळा' यांसारख्या सिनेमांमध्येही झळकली आहे.
7 / 7
तर अभिजीत आमकरने 'अरे वेड्या मना' या स्टार प्रवाहवरील मालिकेतूनच पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने 'आय प्रेम यू', 'टकाटक', 'एक सांगायचय' यांसारखे सिनेमांमध्येही त्याने काम केलंय. सध्या तो 'तू ही रे माझा मितवा मालिकेमध्ये अर्णव हे पात्र साकारत आहे..
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया