By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 15:27 IST
1 / 8मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. रेवती लेले, एतशा-निषाद यांच्यानंतर आणखी एक अभिनेता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. 2 / 8छोट्या पडद्यावरील टीव्ही अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा केला आहे. मी संसार माझा रेखिते फेम शुभम मुरुडकर याने सृष्टी जाधव हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. 3 / 8सृष्टी हीदेखील कलाविश्वात सक्रिय आहे. ती एक मेकअप आर्टिस्ट आहे. एका मालिकेच्या सेटवर त्यांची भेट झाली होती. 4 / 8शुभम आणि सृष्टीने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 5 / 8भाग्य दिले तू मला या मालिकेच्या दरम्यान शुभम आणि सृष्टीची पहिली भेट झाली होती. या मालिकेच्या कास्टिंगची जबाबदारी शुभमकडे होती. 6 / 8मालिकेत एक मेहेंदी आर्टिस्ट हवी होती. कुणीतरी शुभमला सृष्टीचं नाव सुचवलं होतं. त्यानंतर शुभम आणि सृष्टी यांची चांगली मैत्री झाली. 7 / 8या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. शुभमने सृष्टीला प्रपोज करत थेट विचारलं होतं की 'GF बनशील की नाही, की थेट लग्न करशील?'. 8 / 8त्यानंतर सृष्टीने होकार दिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ते दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.