Join us

ब्युटी विथ ब्रेन! इंग्लंडमध्ये शिक्षण, 'या' क्षेत्रात करतेय काम; अक्षर कोठारीची बायको पाहिली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:59 IST

1 / 7
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अक्षय कोठारी (Akshar Kothari) लग्नबंधनात अडकला. बायकोसोबतचे फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना सरप्राईजच दिलं.
2 / 7
'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून अक्षर घराघरात पोहोचला. त्याच्या बायकोचं नाव सारिका खासनीस आहे. सारिकाचा मनोरंजनविश्वाशी काहीही संबंध नाही. सारिका त्याची बालपणीची मैत्रीण आहे.
3 / 7
अबोली रंगाची साडी, दागदागिने, छान हेअरस्टाईल या पारंपरिक लूकमध्ये सारिका खूपच सुंदर दिसत आहे. तसंच अक्षयही सूटबूटमध्ये हँडसम दिसतोय.
4 / 7
सारिका खासनीस दिसायला सुंदर आहेच तितकीच हुशारही आहे. सारिका सायंटिस्ट आहे. विज्ञान विषयात तिचा चांगलाच अभ्यास आहे.
5 / 7
सारिकात रिसर्चर आणि पीएचडी आहे. कॅनडातून तिने शिक्षण घेतलं आहे. कॅन्सर रिसर्चबाबतीत अनेक प्रोजेक्ट्सवर कामाचा तिला १० वर्षांहून अधिकचा अनुभव आहे.
6 / 7
सारिकाने युकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्समधून बायोकेमिस्ट्रीमध्ये पीएचडी केलं आहे. त्यानंतर तिला कॅनडा येथील प्रिन्सेस मार्गारेट कॅन्सर रिसर्च हॉस्पिटल येथे पोस्टडॉक्टरल फेलोशिप मिळाली. कॅन्सर रिसर्चमध्ये तिने खोलवर अभ्यास केला.
7 / 7
तिने बेंचसाय येथे डेटा एक्स्ट्रॅक्शन सायंटिस्ट म्हणून काम केलं. आर्टिफिशयल इंटिलिजन्समचाही ती सध्या अभ्यास आणि त्याचा रिसर्चमध्ये वापर यावर काम करत आहे.
टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारलग्न