Join us

कोण आहे नम्रता संभेरावचा नवरा?; 'तो' तिच्या अभिनयाच्या प्रेमात पडला अन् सुरु झाली Lovestory

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 07:00 IST

1 / 10
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव.
2 / 10
उत्तम अभिनयशैलीमुळे चर्चेत येणारी नम्रता सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे.
3 / 10
नम्रता अनेकदा सोशल मीडियावर तिच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल आयुष्यातील काही गोष्टीही शेअर करत असते.
4 / 10
सध्या नेटकऱ्यांमध्ये तिच्या नवऱ्याची आणि तिच्या फिल्मी लव्हस्टोरीची चर्चा रंगली आहे.
5 / 10
नम्रताचा नवरा कलाविश्वात सक्रीय नाही. मात्र, तरीदेखील तिच्या प्रत्येक पावलावर तिची साथ देत असतो.
6 / 10
नम्रताच्या नवऱ्याचं नाव योगेश असं असून २०१३ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.
7 / 10
योगेश आणि नम्रता यांचं लव्हमॅरेज आहे. एकाच कॉलेजमध्ये असताना त्यांची ओळख झाली.
8 / 10
नम्रता कॉलेजमध्ये असल्यापासून वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची. त्यामुळे तिचा अभिनय त्याने पाहिला होता.
9 / 10
योगेश नम्रताच्या अभिनयाच्या प्रेमात पडला होता. परंतु, या प्रेमाची सुरुवात मैत्रीपासून झाली. सोशल मीडियावर प्रथम त्याने तिच्याशी मैत्री वाढवली. त्यानंतर दोघांची घट्ट मैत्री झाली. त्यानंतर त्याने तिला प्रपोज सुद्धा केलं.
10 / 10
नम्रताला योगेश आधीपासूनच आवडत होता. त्यामुळे तिनेही फार काळ न लावता लगेच त्याला होकार दिला. योगेश आणि नम्रता यांचा सुखाने संसार सुरु असून त्यांना रुद्रराज हा लहान मुलगादेखील आहे.
टॅग्स :नम्रता आवटे संभेरावसेलिब्रिटीटेलिव्हिजन