Join us

अभिनेत्रीइतकीच सुंदर दिसते 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची बहीण, दिवाळीच्या फोटोंमध्ये दिसली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 12:00 IST

1 / 7
अभिनय आणि कॉमेडीची सांगड घालत टॅलेंटच्या जोरावर शिवाली परबने इंडस्ट्रीत स्थान निर्माण केलं आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोने तिला लोकप्रियता मिळवून दिली.
2 / 7
शिवालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. शिवालीने तिच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली.
3 / 7
दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. यामध्ये शिवालीच्या बहिणीचीही झलक दिसत आहे.
4 / 7
शिवालीच्या बहिणीचं नाव स्नेहा परब असं आहे. स्नेहादेखील शिवाली इतकीच सुंदर दिसते.
5 / 7
शिवालीप्रमाणेच स्नेहादेखील सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. अनेकदा ती शिवालीसोबतचे फोटोही शेअर करते.
6 / 7
स्नेहादेखील मॉडेलिंग करते. इन्स्टाग्रामवर तिचे ३०.८ हजार फॉलोवर्स आहेत.
7 / 7
स्नेहाने काही गाण्यांमध्येही काम केलं आहे. अनेकदा ती तिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारदिवाळी २०२५