By देवेंद्र जाधव | Updated: November 21, 2025 14:00 IST
1 / 7ओंकार राऊत हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लोकप्रिय अभिनेता. ओंकारला आपण विविध स्कीटमध्ये अभिनय करताना पाहिलंय.2 / 7ओंकार राऊतने हास्यजत्रेत विविध अभिनेत्रींसोबत कॉमेडी टायमिंग साधत अभिनय केलाय. अशातच ओंकारची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.3 / 7कविरत स्टूडियोला दिलेल्या मुलाखतीत ओंकारला एक प्रश्न विचाण्यात आला. शिवाली परब आणि प्रियदर्शिनी इंदलकरपैकी आवडती सह-अभिनेत्री कोण? असा प्रश्न ओंकारला विचारण्यात आला4 / 7तेव्हा क्षणाचाही विचार न करता ओंकारने शिवालीचं नाव घेतलं. त्यामागचं खास कारणही ओंकारने सांगितलं. 5 / 7ओंकार म्हणाला, ''आम्ही खूप स्कीट्स एकत्र केल्या आहे. त्यामुळे शिवाली आवडती अभिनेत्री आहे''. ओंकारने दिलेल्या उत्तराने सर्वांनी त्याच्या प्रामाणिक स्वभावाचं कौतुक केलं.6 / 7ओंकार राऊत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय. हास्यजत्रेतील विनोदी टायमिंग साधणारा उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओंकारचं कौतुक होतं7 / 7ओंकारची शिवाली आणि प्रियदर्शिनीसोबतची जोडी सर्वांनाच खूप आवडते. शिवाली आणि ओंकार हे दोघं एका स्कीट सीरिजमध्ये एकत्र काम करतात. जिथे ओमकार शिवालीला डेटवर घेऊन जाताना दिसते. शिवाली या स्कीटमध्ये विविध भूमिकेत दिसते.