1 / 6टीव्ही कपल निकितिन धीर आणि कृतिका सेंगर धीर यांच्या घरी एका छोट्या परीच आगमन झालं आहे. निकितिननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही गुड न्यूज चाहत्यांना दिली.(Photo Instagram) 2 / 6आता या आनंदाच्या बातमीने दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. कपलवर सध्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. (Photo Instagram) 3 / 6कृतिकानं तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. (Photo Instagram) 4 / 6निकितिननं 'शेरशाह', 'चेन्नई एक्सप्रेस' आणि 'सूर्यवंशी' या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच तो प्रसिद्ध अभिनेता पंकज धीर यांचा मुलगा आहे. (Photo Instagram) 5 / 6निकितिनची पत्नी कृतिका सेंगर ही स्मोल स्क्रिनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'छोटी सरदारनी' या मालिकेमुळे कृतिका घराघरात पोहोचली. (Photo Instagram) 6 / 63 डिसेंबर 2014 रोजी निकितिन आणि कृतिका लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर कृतिका आणि निकितिन यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. (Photo Instagram)