Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:52 IST
1 / 11काश्मीरी अभिनेत्री, ग्लोबल यूथ लीडर आणि पीस एक्टिविस्ट फरहाना भट्टने बिग बॉस १९ मध्ये एन्ट्री केली आहे. २७ वर्षीय फरहानाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.2 / 11बिग बॉसच्या प्रीमियर नाईटमध्ये फरहानाने तिचं संघर्षमय जीवन लोकांसोबत शेअर केलं. तिने लहानपणापासूनच स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कसा संघर्ष केला हे सांगितलं.3 / 11फरहानाने तिच्या इंट्रो व्हिडिओमध्ये सांगितलं की, ती ४ महिन्यांची असताना तिच्या वडिलांनी तिला सोडून दिलं. वडिलांच्या या निर्णयाने लेकीचं बालपण हिरावून घेतलं.4 / 11संपूर्ण आयुष्य बदललं होतं. आठवीत असताना तिने कुटुंबाचा खर्च उचलण्यासाठी मॉडेलिंग करायला सुरुवात केली. पण यामुळे काही जवळच्या नातेवाईकांना त्रास झाला.5 / 11फरहानाला अनेक व्लॉगमध्ये धमक्या देण्यात आल्या. तिला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या. पण फरहानाने कधीही तिचा मार्ग बदलला नाही.6 / 11अभिनेत्री लैला मजनू या चित्रपटात दिसली. या चित्रपटाने तिला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक दिला. तिला प्रसिद्धी मिळू लागली.7 / 11असं असूनही फरहानाचा समाजाकडून अपमान झाला. तिच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्यात आली. तिला बहिष्काराच्या धमक्या दिल्या.8 / 11हे सर्व असूनही, फरहाना थांबली नाही. आता ती बिग बॉसमध्ये येऊन न घाबरता तिचे मुद्दे मांडेल. तिला स्वतःला शोची विजेती होताना पाहायचं आहे.9 / 11अनेक म्युझिक व्हिडिओंव्यतिरिक्त फरहानाने कंट्री ऑफ ब्लाइड, द फ्रीलान्सर, हेवन ऑफ हिंदुस्तान या वेब शोमध्ये काम केले आहे. 10 / 11अभिनेत्रीचे असंख्य चाहते आहेत. तिने मार्शल आर्ट्समध्ये ५ वेळा राष्ट्रीय पदक जिंकलं आहे.11 / 11