Join us

"रोज फक्त ४५ मिनिटं करा हे काम', जेठालालने सांगितला झपाट्याने वजन कमी करण्याचा खास मंत्र

By देवेंद्र जाधव | Updated: July 9, 2025 12:33 IST

1 / 7
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेत सर्वच कॅरेक्टर्सना प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालं. मालिकेतील अशीच एक व्यक्तिरेखा म्हणजे जेठालाल.
2 / 7
दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल यांनी दीड महिन्यात १६ किलो वजन कसं घटवलं, याचा अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. २०२३ मध्ये मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दिलीप जोशींनी याबद्दल सांगितलं होतं.
3 / 7
१९९२ मध्ये 'हुन हुंशी हंशीलाल' हा एक गुजराती सिनेमा आला होता. या सिनेमात दिलीप जोशींना बारीक दिसायचं होतं. त्यामुळेच भूमिकेची तयारी म्हणून दिलीप जोशींनी वजन कमी करायला सुरुवात केली.
4 / 7
यासाठी दिलीप जोशींनी खूप मेहनत केली. ते आधी स्विमिंग क्लबमध्ये जायचे. तिथून कपडे बदलून ते मरीन ड्राईव्हला जायचे. तिथे रोज ४५ मिनिटं ते जॉगिंग करायचे.
5 / 7
मरीन ड्राईव्ह ते ओबेरॉय हॉटेल दिलीज जोशी धावायचे. रोज जब्बल ४५ मिनिटं न चुकता ते व्यायाम करायचे. त्यामुळे दीड महिन्यात दिलीप यांनी १६ किलो वजन कमी केलं.
6 / 7
दिलीप जोशींचं हे ट्रान्सफॉर्मेशन अनेकांना थक्क करणारं होतं. दिलीप जोशी गेली १५ हून अधिक वर्ष 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत अभिनय करत आहेत.
7 / 7
या मालिकेत दिलीप जोशी जेठालालची भूमिका साकारुन सर्वांचं मन जिंकत आहे. मालिकेतील जेठालाल-दयाबेनची जोडी प्रेक्षकांचं मन जिंकून गेली आहे
टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानीटिव्ही कलाकारटेलिव्हिजनबॉलिवूड