Join us

"मला गृहिणीच बनून राहायचं होतं, आई व्हायचं होतं", लग्नानंतर अभिनेत्रीने व्यक्त केलेली इच्छा; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:26 IST

1 / 7
'दिल मिल गए' मालिकेतून लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे करणसिंह ग्रोवर (Karan Singh Grover) आणि जेनिफर विंगेट (Jennier Winget). याच मालिकेवेळी दोघंही प्रेमात पडले आणि त्यांनी २०१२ साली लग्नही केलं.
2 / 7
ही रोमँटिक जोडी चाहत्यांच्या अगदीच आवडीची होती. करणसिंह ग्रोवरशी लग्न केल्यानंतर जेनिफर आनंदात होती. आता मला गृहिणीच बनून राहायला आवडेल असंही ती म्हणाली होती.
3 / 7
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत जेनिफरने इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणालेली की, 'लग्नानंतर करिअर सोडायचं असं मी ठरवलं होतं. माझ्या या निर्णयाला घरातील मंडळींनी विरोध केला होता.'
4 / 7
'मला सगळ्यांनीच पुन्हा विचार कर असं सांगितलं होतं. पण मी ऐकलं नाही. कारण मला हाऊसवाईफच राहायचं होतं. मला काम मिळालं नाही तरी काही फरक पडत नव्हता.'
5 / 7
जेनिफर एकेकाळी टीव्हीवर सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. त्यामुळे तिच्या या निर्णयाचा चाहत्यांना धक्का बसला होता. लग्नानंतर दोन वर्षातच तिचा संसार मोडला.
6 / 7
आमिर खान आणि मनीषा कोईरालाच्या 'अकेले हम अकेले तुम' सिनेमात ती बालकलाकाराच्या भूमिकेत होती. तसंच ऐश्वर्या-अभिषेकच्या 'कुछ ना कहो'मध्येही ती झळकली.
7 / 7
नंतर जेनिफरने 'कसौटी जिंदगी की','दिल मिल गए','सरस्वीचंद्र','बेहद' या मालिकांमधून लोकप्रियता मिळवली.
टॅग्स :जेनिफर विगेंटकरण सिंग ग्रोव्हरटिव्ही कलाकारघटस्फोट