डोळ्याला मोठा भिंगाचा चष्मा आणि पुढे आलेले दात; जस्सीचा बदलला लूक, आता ओळखताही येत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:37 IST
1 / 8'जस्सी जैसी कोई नही' मालिकेतील डोळ्याला मोठा भिंगाचा चष्मा आणि पुढे आलेले दात असा लूक केलेली जस्सी आठवतेय का? 2 / 8मालिकेतील हे पात्र प्रचंड व्हायरल झालं होतं. या मालिकेतील जस्सीला प्रचंड प्रेम मिळालं आणि ती घराघरात पोहोचली. 3 / 8पण, आता जस्सी पहिल्यासारखी राहिलेली नाही. इतक्या वर्षांनी आता तिचा लूक खूप बदलला आहे. 4 / 8'जस्सी जैसी कोई नही' मालिकेत जस्सीची भूमिका अभिनेत्री मोना सिंगने साकारली होती. या मालिकेने मोनाला प्रसिद्धी मिळवून दिली. 5 / 8पण मालिका संपल्यानंतर मात्र मोनाचा वेगळाच लूक पाहायला मिळाला. मोना खऱ्या आयुष्यात जस्सीसारखी अजिबातच नाही. 6 / 8ती खूप ग्लॅमरस राहते आणि सुंदरही दिसते. सोशल मीडियावरुन मोना तिचे फोटो शेअर करत असते. 7 / 8पारंपरिक लूक असो वा वेस्टर्न आऊटफिट मोना प्रत्येक लूकमध्ये खूपच सुंदर दिसते. 8 / 8'जस्सी जैसी कोई नही' मालिकेनंतर मोनाचं नशीब पालटलं. तिला अनेक मालिका आणि सिनेमांची लॉटरी लागली.