'जय मल्हार'फेम सुरभी हांडेच्या रिअल लाइफ खंडेरायांना पाहिलंय का कधी? जाणून घ्या तिच्या नवऱ्याविषयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 15:00 IST
1 / 9जय मल्हार या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सुरभी हांडे.2 / 9जय मल्हार या मालिकेत सुरभीने म्हाळसा देवी ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या भूमिकेमुळे ती विशेष लोकप्रिय झाली.3 / 9सध्या सुरभीचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कायम सक्रीय असते.4 / 9सुरभी अनेकदा तिच्या ग्लॅमरस फोटोसोबतच तिच्या कुटुंबासोबतचेही फोटो शेअर करत असते.5 / 9अनेकदा सुरभीच्या नवऱ्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.6 / 9सुरभीच्या नवऱ्याचं नाव दुर्गेश कुलकर्णा आहे. २०१९ मध्ये सुरभी आणि दुर्गेशने लग्नगाठ बांधली.7 / 9पुण्यातील मुळशी येथील ढेपेवाडा येथे सुरभी-दुर्गेशने लग्न केलं. 8 / 9सुरभी आणि दुर्गेश एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.9 / 9जय मल्हार, लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकांमध्ये झळकली आहे. तसंच अग्गं बाई अरेच्चा 2 या चित्रपटातही तिने छोटेखानी भूमिका साकारली आहे.