Join us

बेधडकपणे बोलणारा हिंदुस्थानी भाऊ आहे कोट्यधीश; जाणून घ्या, त्याचं net worth

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 15:54 IST

1 / 10
बेधडक आणि बिंधास्त बोलण्याच्या शैलीमुळे कायम चर्चेत येणारा प्रसिद्ध युट्यूबर म्हणजे हिंदुस्थानी भाऊ.
2 / 10
आजच्या घडीला हिंदुस्थानी भाऊला कोणी ओळखत नाही असं म्हणणारा व्यक्ती क्वचितच सापडेल.
3 / 10
हिंदुस्थानी भाऊ अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करुन अडचणीतही आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची या ना त्या कारणाने चर्चा रंगत असते. यामध्येच सध्या त्याचा वैयक्तिक आयुष्याची चर्चा रंगली आहे.
4 / 10
हिंदुस्थानी भाऊचं खरं नाव विवेक पाठक असं असून आज तो प्रसिद्ध युट्यूबर म्हणून ओळखला जातो.
5 / 10
सोशल मीडिया सेन्सेशन असलेल्या हिंदुस्थानी भाऊचे आज इन्स्टाग्रामवर १.४ मिलिअन फॉलोअर्स असल्याचं पाहायला मिळतं.
6 / 10
युट्यूबर होण्यापूर्वी हिंदुस्थानी भाऊ एका मराठी वृत्तपत्रासाठी रिपोर्टरचं काम करायचा. २०११ मध्ये त्याला क्राइम रिपोर्टिंगसाठी पुरस्कारदेखील देण्यात आल्याचं सांगण्यात येतं.
7 / 10
तरुणाईमध्ये क्रेझ असलेला हिंदुस्थानी भाऊ युट्यूबरवर कायम वादग्रस्त किंवा मिमिक्री करणारे व्हिडीओ शेअर करत असतो.
8 / 10
'रुको जरा सबर करो', 'पहली फुर्सत में निकल' अशा कितीतरी वाक्यांमुळे लोकप्रिय झालेला हिंदुस्थानी भाऊ आज कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.
9 / 10
सूत्रांच्या माहितीनुसार, हिंदुस्थानी भाऊची एकूण संपत्ती १.८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. म्हणजे भारतीय चलनानुसार, सुमारे १३० कोटी रुपये इतकी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो लाखो रुपये कमवत असल्याचं सांगण्यात येतं.
10 / 10
हिंदुस्थानी भाऊ मुंबईतील एका आलिशान फ्लॅटमध्ये राहत असून त्याला पत्नी अन् एक मुलगादेखील आहे. हिंदुस्थानी भाऊला कार आणि बाईक्सची आवड आहे. त्याच्याकडे Yamaha R15, Royal Enfield आणि Suzuki Ertiga अशा काही गाड्या आहेत.
टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकार