By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 16:00 IST
1 / 7टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका म्हणजे क्राईम पेट्रोल. या मालिकेमध्ये पोलीस शेवटी गुन्हेगारांपर्यंत पोहचतातच. असं साधारण कथानक असतं. 2 / 7या लोकप्रिय मालिकेचे शो अनेकांनी होस्ट केले आहेत. अनुप सोनी, आशुतोष राणा या कलाकारांसोबत अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी देखील या कार्यक्रम होस्ट करत होती. त्यामुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला होता. 3 / 7इतकंच नाहीतर क्राईम शो होस्ट केल्यामुळे त्याचा अभिनेत्रीच्या मानसिक स्वास्थावर गंभीर परिणाम झाला, असा धक्कादायक खुलासा तिने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केला आहे.4 / 7अलिकडेच दिव्यांका त्रिपाठीने भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यादरम्यान, ती म्हणाली, 'मी क्राइम पेट्रोल होस्ट करत होते. त्यामध्ये बरेच एपिसोड होते, महिला विरुद्ध गुन्हेगारी असा तो एक भाग होता. त्यावेळी मी स्पष्ट सांगितलं होतं की, मी फक्त सूत्रसंचालनच नाही करणार तर मला प्रत्येक एपिसोडमागची स्टोरी ऐकायची आहे. आता प्रत्येक वेळी मला कथा माहित असायची. तिथे मुलगी हसत खेळत घराबाहेर पडली आणि काहीतरी घडलं, असं काहीतरी असायचं.'5 / 7त्यानंतर दिव्यांका म्हणाली, 'प्रत्येक कथा भयानक होती. असं झालं की, एका रात्री शोची कथा वाचत असताना मला भयानक स्वप्ने पडत होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझं डोकं प्रचंड दुखत होतं. त्या अवस्थेत मी शूटला पोहोचले. हे सुमारे ३-४ महिन्यांपूर्वी घडलं होतं आणि त्याचा माझ्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम झाला. असा धक्कादायक खुलासा अभिनेत्रीने केला. 6 / 7'ये हे मोहोब्बतें' या मालिकेतून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी घराघरात पोहोचली. हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असलेली दिव्यांका त्रिपाठीचे असंख्य चाहते आहेत. 7 / 7ती फार सुंदर दिसते. चाहते तिच्या अदांवर घायाळ होतात. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.