Join us

SEE PICS : ‘टाईमपास’ची चंदा ते स्वीटू...; वाचा, अन्विता फलटणकरचा प्रेरणादायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 15:27 IST

1 / 9
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेमधील आपल्या सर्वांची लाडकी स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकर आज तिचा वाढदिवस साजरा करतेय.
2 / 9
‘टाईमपास’ या सिनेमात छोटीशी भूमिका करणारी अन्विता आज ‘येऊ कशी तशी मी नांदायला ’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसतेय. तिचा हा प्रवास मुळातच प्रेरणादायी आहे.
3 / 9
ठाण्यात जन्मलेल्या अन्विताच्या कुटुंबाचा फिल्मी दुनियेशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. मग अन्विता फिल्मी दुनियेत कशी आली? तर डान्समुळे.
4 / 9
होय, लहानपणापासूनच अन्विताला डान्सची भारी आवड होती. पाच वर्षांची असल्यापासून तिने भरतनाट्य शिकायला सुरूवात केली. पुढे शाळेत असताना ती नाटकात काम करू लागली.
5 / 9
रूपारेल कॉलेजात शिकत असताना अचानक ‘टाईमपास’ या सिनेमासाठी तिची निवड झाली. तेव्हा अन्विता केवळ 16 वर्षांची होती.
6 / 9
‘टाईमपास’ या सिनेमातील आपली छोटीशी भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडेल, याची अन्विताला जराही कल्पना नव्हती. पण तिची ही भूमिका चांगलीच गाजली.
7 / 9
नंतर ‘गर्ल्स’ या सिनेमातही तिला संधी मिळाली. छबीदार छबी या सुपरहिट गाण्यावर अन्विताने केलेला तुफान डान्स तर सगळ्यांच्याच डोळ्यांत भरला.
8 / 9
बीए इन थिएटर या विषयात पदवी पूर्ण केल्यानंतर अन्विता नाटकात काम करत होती. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातही ती झळकली.
9 / 9
पुढे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेसाठी तिला आॅडिशनसाठी बोलावलं गेलं आणि ती सिलेक्टही झाली. मग काय स्वीटूच्या या भूमिकेनं अन्विकाचं अख्ख आयुष्यचं बदललं.
टॅग्स :टेलिव्हिजनझी मराठी