1 / 7गौरव मोरे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. गौरवने महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून खूप प्रसिद्धी मिळाली2 / 7गौरवची हास्यजत्रेत वनिता खरात, ओंकार भोजने यांच्यासोबत चांगली जोडी जमली. आता गौरव चला हवा येऊ द्यामध्ये झळकणार आहे.3 / 7गौरव आता हास्यजत्रेतील वनिताला सुद्धा चला हवा येऊ द्या मध्ये घेऊन जाणार का? असं विचारलं असता गौरवने दिलेलं खास उत्तर चर्चेत आहे4 / 7गौरवने लोकमत फिल्मीशी बोलताना सांगितलं की, 'असं काही नाहीये, मला फसवू नका.' असं हसत हसतच गौरवने सांगितलं. पुढे गौरवने वनिताचं कौतुक केलं5 / 7गौरव वनिताबद्दल बोलताना म्हणाला, ती आहे बिचारी तिकडे काम करतेय. पण ती चांगली अभिनेत्री आहे. तिच्यासारखी अभिनेत्री नाहीये. वनिता या वयात खूप चांगल्या पद्धतीने काम करतेय. 6 / 7वनिता स्टेजवर कोणासोबतही काम करु शकते. तुम्ही कितीही मोठा कलाकार आणा वनिता त्याला टफ देणार, एवढी भारी काम करते वनिता. माझी फेव्हरेट आहे ती, असंही गौरव म्हणाला7 / 7मी स्कीट करताना जेवढ्या अॅडिशन घ्यायचो ना ते वनिताला कळायचं की हा काय करणारेय म्हणून. मी आणि भोजने होतो तेव्हा आम्ही तिला डोळ्यांनी खुणवायचो तेव्हा ती पुढचं वाक्य उचलायची. तिला ते कळायचं एवढी हुशार अभिनेत्री आहे ती, असं गौरव म्हणाला.