By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 16:15 IST
1 / 7लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची मुख्य भूमिका असलेली ताली या वेब सीरिजची चांगलीच चर्चा झाली.2 / 7गौरी यांच्या आयुष्यावर आधारलेली ही सीरिज सध्या प्रचंड गाजतेय. या वेबसीरिजमध्ये अनेक मराठी कलाकारांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.3 / 7 या वेबसीरिजमध्ये अनेक मराठी कलाकारही झळकले.4 / 7 त्यातच गौरी सावंत यांच्या बालपणीची भूमिका साकारून एका मराठी अभिनेत्रीने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं होतं.ही अभिनेत्री म्हणजे कृतिका देव.5 / 7 कृतिकाने या वेबसीरिजमध्ये गौरी सावंत यांचं बालपण साकारलं आहे. गौरी आधी गणेश असताना कशी होती? हे चित्र कृतिकाने आपल्या अभिनयातून उभं केलं आहे.तिच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं.6 / 7 अभिनेत्री कृतिका देवला आपण अनेक सिनेमांच्या माध्यमातून भेटलोय.'बकेट लिस्ट', 'अनया',' राजवाडे अँड सन्स' या सिनेमांमध्ये ती दिसली होती.7 / 7नुकतंच कृतिकाने 'स्टार प्रवाह'वर 'लपंडाव' या मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण केलंय. या मालिकेत ती सखी नावाची मुख्य भूमिका साकारते आहे.