By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 11:38 IST
1 / 9छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेली स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत अमोल कोल्हेंनी शंभूराजेंची भूमिका साकारली होती. 2 / 9मालिका संपून ५ वर्ष झाली तरीदेखील ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. पण, छावा सिनेमानंतर या मालिकेबाबत काही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. 3 / 9 मालिकेवर राजकीय दबाव होता का? याबाबत अमोल कोल्हेंनी उत्तर दिलं. 4 / 9'२०१७ पासून मी राजकीयदृष्ट्या अलूप होतो. मी शिवसेनेतही सक्रिय नव्हतो. मालिका २०२० ला संपली. मी २०१९ ला निवडणूक लढवली'.5 / 9राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी मालिकेचा शेवट अशा पद्धतीने दाखविण्यात सांगितलं होतं, असंही बोललं जात होतं. 6 / 9यावर अमोल कोल्हे म्हणाले, 'शरद पवारांनी कधीही एका शब्दानेही अमूक प्रसंग दाखवा किंवा दाखवू नका असं सांगितलेलं नव्हतं'. 7 / 9'किंबहुना पवार साहेबांनी तेव्हा मालिका पाहिलीच नव्हती. त्यांनी करोनाच्या काळात पहिल्यांदा मालिका पाहिली'. 8 / 9'करोना काळात मालिकेचं पुन:प्रक्षेपण करण्यात आलं होतं. त्यावेळी शरद पवारांनी पहिल्यांदा 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका संपूर्ण पाहिली'. 9 / 9'त्यामुळे यामध्ये शरद पवारांचा हात होता आणि कोणाला तरी खूश करण्यासाठी असा शेवट दाखवला हे धादांत खोटं आहे'.