Join us  

तेरी झुकी नज़र, तेरी हर अदा... धनश्री वर्माच्या सौंदर्यापुढे चाहते 'क्लीन बोल्ड', पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 4:14 PM

1 / 8
Dhanashree Verma, Yuzvendra Chahal Wife Photos: भारतात IPL हा क्रिकेटचा उत्सव सुरु आहे. या उत्सवाला अनेक जण ग्लॅमरचा तडका लावतात.
2 / 8
युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही त्यापैकीच एक. सोशल मीडिया असो किंवा क्रिकेटचे स्टेडियम, धनश्रीच्या लूककडे साऱ्यांच्याच नजरा लागलेल्या असतात.
3 / 8
युजवेंद्र चहल राजस्थानच्या संघात आहे. त्याला आणि त्याच्या संघाला चीअर करण्यासाठी धनश्री नेहमीच सज्ज असते.
4 / 8
राजस्थानच्या संघासोबत आणि पतीसोबत धनश्रीही अनेकदा विविध शहरांमध्ये प्रवास करते आणि चहलला सपोर्ट करताना दिसते.
5 / 8
युजवेंद्र चहलचा राजस्थान रॉयल्स आणि श्रेयस अय्यरचा कोलकाता नाइट रायडर्स हे संघ आज आमनेसामने असणार आहेत.
6 / 8
धनश्रीदेखील या सामन्यात राजस्थान आणि चहलचा उत्साह वाढवण्यासाठी स्टेडियममध्ये हजर असणार असेल अशी चाहत्यांना आशा आहे.
7 / 8
या सामन्याआधी तिने काही खास फोटो सोशल मीडियावर आपल्या अधिकृत इन्स्टा पेजवर पोस्ट केले आहेत.
8 / 8
धनश्री वर्माने इन्स्टा पोस्टमध्ये जे फोटो पोस्ट केले आहेत, त्यात झेब्रा प्रिंट थ्री पीस वेस्टर्न ड्रेसमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.
टॅग्स :युजवेंद्र चहलराजस्थान रॉयल्सश्रेयस अय्यरआयपीएल २०२४