Sonarika Bhadoria: देवों के देव महादेव फेम सोनारिका भदौरियाचा होतोय विवाह, रोका सेरेमनीचे फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 12:49 IST
1 / 8Sonarika Bhadoria Love Story: टीव्ही अभिनेत्री सोनारिका भदोरियाने तिचा बॉयफ्रेंड विकास पराशरसोबत रोका केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 8'देवों के देव...महादेव'मध्ये पार्वतीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेल्या सोनारिका भदोरिया घराघरात पोहोचली. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 8सोनारिका भदोरिया आणि विकास पराशरने 3 डिसेंबर 2022 रोजी समुद्रकिनारी एका नयमरम्य ठिकाणी रोका केला ज्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 8सोनारिका भदोरियाने लैव्हेंडर रंगाचा फिश कट लेहेंगा घातला आहे ज्यात ती खूपच सुंदर दिसतेय.(फोटो इन्स्टाग्राम)5 / 8सोनारिकाने तिचा लूक ग्रीन कलरचा चोकर, मांग टिक्का, कानातले आणि सोनेरी पेंडेंटने पूर्ण केला आहे. विकास व्हाईट कलरच्या पँट-सूटमध्ये हँडसम दिसतोय. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 8फोटो शेअर करताना सोनारिकाने कॅप्शनमध्ये लिहिले, '2.12.2022. मला संपूर्ण आयुष्याची भेट मिळाली. या आशीर्वादासाठा मी सदैव ऋणी राहीन. हॅप्पी हॅप्पी रोका लव्ह.'(फोटो इन्स्टाग्राम)7 / 8अभिनेत्रीने तिच्या लव्हस्टोरीबाबत एका मुलाखतीत बोलताना खुलासा केला होता की, विकास तिच्या भावाचा मित्र आहे. त्यांची पहिली भेट एका जिममध्ये झाली. (फोटो इन्स्टाग्राम)8 / 8सोनारिका आणि विकास एकमेकांना ७ वर्षांपासून डेट करत होते. अभिनेत्रीने तिचं नातं मीडियापासून कायम दूर ठेवलं. सोनारिका भदोरियाचा होणार पती विकास पराशर ग्लॅमर जगापासून दूर आहे. तो एक बिझनेसमन आहे.(फोटो इन्स्टाग्राम)