Join us  

सीआयडीचा ‘दया’ एका एपिसोडसाठी घेतो लाख रूपये, इतकी आहे महिन्याची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 6:45 PM

1 / 12
छोट्या पडद्यावरच्या सीआयडी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्ष राज्य केले. कार्यकमातील एक लोकप्रिय पात्र होते इन्स्पेक्टर दयाचे. जो दरवाजा तोडण्यासाठी प्रसिद्ध होता.
2 / 12
सीआयडी या मालिकेचे इन्स्पेक्टर दयाचे पात्र दयानंद शेट्टी याने साकारले होते. या मालिकेमुळे त्याला ख-या अर्थाने लोकप्रियता मिळाली होती.
3 / 12
खरे तर ही दयानंदची पहिली मालिका होती. पण त्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.
4 / 12
अनेकांना ठाऊक नसेल पण अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी दयानंद शेट्टी हा एक खेळाडू होता.
5 / 12
1994 मध्ये महाराष्ट्रातून डिस्कस थ्रोचा तो चॅम्पियन होता.
6 / 12
डिस्कस थ्रो या गेममध्ये चॅम्पियन झाल्यानंतर दयानंदकडे अभिनयाची संधी चालून आली. सीआयडी कार्यक्रमासाठी त्याने ऑडिशन दिले आणि हे ऑडिशन त्याने पासही केले. इन्स्पेक्टर दयाच्या भूमिकेसाठी त्याची निवड झाली.
7 / 12
या दयाची एक दिवसाचे मानधन किती माहितीये? तर 1 लाख रूपये. एका दिवसाच्या शुटिंगसाठी दया एक लाख रुपये घेतो.
8 / 12
याचा अर्थ दया दररोज शूटिंग करत असेल तर त्यांची महिन्याची कमाई 30 लाख रुपये आहे.
9 / 12
दयानंद शेट्टीने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. यात सिंघम रिटर्न्स, जॉनी गद्दार आणि रनवे या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
10 / 12
सीआयडी मालिकेतच्या सुरुवातीच्या काळात मोनी आंबेगावकरने काम केले होते. यादरम्यान दयानंद व मोना यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
11 / 12
दया आणि मोनी यांना एक मूल देखील असल्याचे मानले जाते.
12 / 12
दयानंदचे लग्न स्मिता शेट्टीशी झाले असून दोघांनी एक मुलगी आहे.
टॅग्स :सीआयडी