Charu Asopa : "संशय घेतला, ड्रायव्हरसोबत लफडं सुरू असल्याचं म्हणाला"; अभिनेत्रीचे पतीवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 18:37 IST
1 / 9अभिनेत्री चारू असोपा तिचा पती राजीव सेनपासून वेगळी राहत आहे. चारू आणि राजीव यांच्यातील वाद टोकाला गेले आहेत. दोघांना एक गोड मुलगी आहे. 2 / 9अभिनेत्रीने पतीवर खूप गंभीर आरोप केले आहेत. तिचा नवरा तिच्यावर संशय घेतो तसेच तिला खूप वाईट बोलतो असं याआधी सांगितलं आहे. 3 / 9चारूने एका मुलाखतीत म्हटलं की, 'काहीच कारण नसताना पती संशय घेतो. घरात कोणी आलं आणि मी त्यांच्याशी बोलली तरी संशय घेतो.' 4 / 9'ड्रायव्हरसोबत तुझं लफडं सुरू आहे असं देखील तो मला म्हणाला. मी मॅरिज काऊंसलरकडे जाण्यासाठी तयार होते पण तो कधी आलाच नाही.' 5 / 9'मला वाटतं की तो मला धोका देत आहे. त्याचं कोणासोबत तरी अफेअर सुरू आहे. तो नेहमीच दिल्लीला जात असतो.' 6 / 9'राजीवने माझं जगणं अवघड केलं होतं. तो सेटवर सर्वांना फोन आणि मेसेज करायचा की, चारूपासून लांब राहा' असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.7 / 9चारू आणि राजीवने अद्याप घटस्फोट घेतलेला नाही. तो त्याच्या मुलीला भेटायला नेहमीच येत असतो. 8 / 9अभिनेत्री सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती तिच्या मुलीसोबतचे सुंदर फोटो शेअर करत असते. 9 / 9