Join us

CHYD: 'चला हवा येऊ द्या'मधून जुन्या कलाकारांचा पत्ता कट, दिसणार 'हे' नवे चेहरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:19 IST

1 / 10
'चला हवा येऊ द्या' हा टीव्हीवरील गाजलेला कॉमेडी शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
2 / 10
पण, यंदाच्या सीझनमध्ये 'चला हवा येऊ द्या'मधील काही जुने चेहरे दिसणार नाहीत. त्यांची जागा काही नवीन चेहऱ्यांनी घेतली आहे.
3 / 10
'चला हवा येऊ द्या'मधून निलेश साबळेने एक्झिट घेतली आहे. त्यामुळे या पर्वात तो दिसणार आहे.
4 / 10
या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकर करणार आहे. अभिजीतने निलेश साबळेला रिप्लेस केलं आहे.
5 / 10
निलेश पाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमनेही एक्झिट घेतली आहे.
6 / 10
'चला हवा येऊ द्या'च्या या पर्वात श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके हे जुने हास्यरथी दिसणार आहेत.
7 / 10
'चला हवा येऊ द्या'मधून घराघरात पोहोचलेला सागर कारंडे या पर्वात दिसणार की नाही याबाबत शंका आहे. कारण, प्रोमोमध्ये सागर दिसला नाही.
8 / 10
या कॉमेडी शोमधून प्रसिद्धी मिळवलेली स्नेहल शिदमही 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या प्रोमोमध्ये दिसली नाही.
9 / 10
तर या पर्वात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे दिसणार आहे.
10 / 10
याशिवाय 'चला हवा येऊ द्या'मध्ये प्रियदर्शन जाधवही दिसणार आहे.
टॅग्स :चला हवा येऊ द्यानिलेश साबळेभाऊ कदमश्रेया बुगडे