1 / 9'चला हवा येऊ द्या' हा मराठी टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय कॉमेडी शो. १० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करून निरोप घेतलेला हा शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.2 / 9'चला हवा येऊ द्या' शोचं सूत्रसंचालन करून निलेश साबळेने प्रसिद्धी मिळवली होती. पण, आता नव्या सीझनमध्ये मात्र निलेश साबळे दिसणार नाहीये. 3 / 9निलेश साबळेच्या जागी आता 'चला हवा येऊ द्या'चं सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकर करताना दिसणार आहे. 4 / 9'चला हवा येऊ द्या'मधून निलेश साबळेचा पत्ता कट झाला आहे. पण, सुरुवातीच्या सीझनला निलेश साबळे किती मानधन घ्यायचा हे तुम्हाला माहितीये का? 5 / 9हसताय ना.. हसायलाच पाहिजे... या पहिल्याच वाक्यानं सगळ्यांचं जिंकणारा महाराष्ट्राचा लाडका सूत्रसंचालक, कॉमेडियन, लेखक, दिग्दर्शक म्हणजे डॉ. निलेश साबळे. 6 / 9पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर असणाऱ्या निलेश साबळेने २०१० साली मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमाचा विजेता होता. 7 / 9ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केल्यानंतर 'चला हवा येऊ द्या'ची धुरा त्याने सांभाळली. 8 / 9मीडिया रिपोर्टनुसार, 'चला हवा येऊ द्या' या शोचं सूत्रसंचालन करण्यासाठी निलेश साबळे एक ते दीड लाख रुपये इतकं मानधन घ्यायचा. 9 / 9'चला हवा येऊ द्या' बंद झाल्यानंतर 'हसताय ना हसायलाच पाहिजे' हा नवा शो निलेश साबळेने सुरू केला होता.