1 / 9'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कॉमेडी शोचं दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमधूनच अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली होती. 2 / 9श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, सागर कारंडे हे नवोदित कलाकार 'चला हवा येऊ द्या'मुळे घराघरात पोहोचले होते. याच शोमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. 3 / 9'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात यातील काही चेहरे दिसणार नाहीत. पण, हे कलाकार आता काय करतात हे तुम्हाला माहितीये का? 4 / 9कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे 'चला हवा येऊ द्या' शो संपल्यानंतर ड्रामा ज्युनियर्सचं सूत्रसंचालन करताना दिसली. आता ती नव्या पर्वातून पुन्हा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज आहे. 5 / 9श्रेयासोबतच कुशल बद्रिकेही 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात दिसणार आहे. 6 / 9'चला हवा येऊ द्या'च्या पर्वात भारत गणेशपुरेदेखील पाहायला मिळणार आहे. 7 / 9सागर कारंडेने 'चला हवा येऊ द्या'मधूनच लोकप्रियता मिळाली. हा शो संपल्यानंतर तो जाऊबाई गावातमध्ये दिसला होता. पण नव्या पर्वाच्या प्रोमोमध्ये तो दिसला नाही. 8 / 9सर्वांचा लाडका भाऊ कदम 'चला हवा येऊ द्या'मधूनच घराघरात पोहोचला. पण, नव्या सीझनमध्ये तो दिसणार नाहीये. 9 / 9भाऊ कदम सध्या निलेश साबळेसोबत सिनेमा करत आहे. ज्याच्या शूटिंगमध्ये तो बिझी आहे.